ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरचा निकाल १००

Edited by:
Published on: May 13, 2025 18:20 PM
views 25  views

सावंतवाडी : ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक तन्वी ज्ञानेश्वर गावकर ९७.८० % (५०० पैकी ४८९ गुण) द्वितीय क्रमांक साक्षी सखाराम गावकर आणि रिया संतोष सावंत प्रत्येकी ९६ % (५०० पैकी ४८० गुण) तृतीय क्रमांक तन्वी चंद्रकांत गावकर ९२.८० % (५०० पैकी ४६४ गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत २३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ९ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.