
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी, बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबादारीने पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
ही निवडणूक दि.२६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११ मध्ये होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ दस्तऐवज सोबत ठेवणे अनिवार्य आहे. १) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेली नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) जर यावर छायाचित्र नसेल तर त्यासोबत अन्य फोटो आयडी पुरवा जोडणे आवश्यक आहे.
२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र (Identity Card).
३) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले छायाचित्रासंहित ओळखपत्र.
४) विवाहित महिला मतदारांसाठी जर नाव बदलेले असेल तर नाव बदलल्याबाबतचा अधिकृत पुरावा (शासन अधिसूचना/ गॅझेट) सादर करणे आवश्यक आहे.
मोबाईल आणि कॅमेरा, मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीस व्हिडिओ कॅमेरा वापरण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. मतदना पध्दत, मतदान गुप्त व पारंपारिक पध्दतीने मतपत्रिकेव्दारे घेण्यात येईल.
मतदान प्रक्रिया : प्रत्येक मतदारास नऊ (९) मते देता येतील. मतदारास ज्या उमेदवारास मत द्यायचे आहे, त्यांच्या नावासमोर (X) अशी खूण त्यांना पुरविण्यात आलेल्या काळ्या बॉल पेनाने करावी अशा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबदाऱ्याने पार पडावा असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.










