
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक यांची एकमुखी निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा वैभव नाईक यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने आणि एकदिलाने शिवसेना संघटनेचे काम करण्याचे आवाहन उद्धवजी ठाकरे यांनी केले. वैभव नाईक म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी सोपवली आहे, ती योग्य रीतीने पार पाडून, सर्वांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुख पदाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, अरुण दुधवडकर, गौरीशंकर खोत, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, रुपेश राऊळ, संग्राम प्रभुगावकर,हरी खोबरेकर, कृष्णा धुरी, सचिन कदम, प्रथमेश सावंत, जयेश नर,नंदू शिंदे, चंद्रकांत कासार, गणेश गावकर, उत्तम लोके, रवींद्र जोगल, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, संकेत नाईक, जयेश धुमाळे, योगेश धुरी, बाबी जागी, संजय गवस, नितीन वाळके, राजू राठोड, तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगुत, बाळा गावडे, अवधूत मालणकर, दिनेश चमणकर, वैदेही गुडेकर, सुशील चिंदरकर,समीर लब्दे, रुपेश आमडोसकर, अमर घाडी, अमोल वस्त, स्वप्नील आचरेकर, सुहास गावडे व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.










