कळसुलकर हायस्कूलमध्ये डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा मार्गदर्शन

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 24, 2026 19:56 PM
views 20  views

सावंतवाडी : युरेका सायन्स सेंटर,कणकवली आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल,सावंतवाडी यांच्या संयक्त विद्यमाने डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा मार्गदर्शन वर्ग कळसुलकर प्रशालेत सकाळी 10 वाजता घेण्यात आले. मार्गदर्शन वर्गाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सुष्मिता केणी यांचा त्यांना मिळालेल्या मराठी विज्ञान परिषद मुंबई यांचा प्रतिष्ठित मानला जाणारा सुधाकर उद्धवराव आटले विज्ञान प्रसार पुरस्कारासाठी अभिनंदन करत सन्मान करण्यात आला.याप्रसंगी माझे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठसकर,नगरसेविका सौ.दुलारी रांगणेकर व इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेचे स्वरूप, भविष्यातील या परीक्षेचे महत्व,तसेच इतर देश पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे मार्गदर्शन त्यांनी  आपल्या अभ्यासू आणि ओघवत्या शैलीने समजावून दिले. या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील इतर शाळांच्या विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला. या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन,सूत्रसंचालन आणि आभार प्रशालेच्या विज्ञानप्रमुख सोनाली बांदेलकर यांनी मानले.