
सिंधुदुर्गनगरी : वराड येथील स्फटिक शिवलिंग वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, या गावातील मानकरी तसेच ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवला आहे. वराड या गावात सुरु झालेले स्पटीक शिवलिंग मंदिरास आमचा पूर्णपणे विरोध आहे. या मंदिरासाठी कोणत्याही परवानग्या घेतल्या गेल्या नसून आम्हाला आमच्या गावात समांतर मंदिर नको अशी मागणी वराड गावातील श्री देव वेताळ व इतर देवस्थान ट्रस्ट, यांच्यावतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आदींकडे केली आहे.प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करत हे मंदिर आपल्या गावातून तात्काळ हलवावे. कारण आमच्या गावामध्ये पुरातन स्वयंभू लिंगेश्वर मंदिर आहे त्यामुळे आमच्या गावांमध्ये समांतर निर्माण स्फटिक शिवलिंग मंदिर नको या ठिकाणी योग्य गोष्टी चालत नाहीत. अशी तक्रार केली आहे. त्याचबरोबर या मंदिराला कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी धर्मादाय विभागाकडेही करण्यात आली आहे.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल परब, उपाध्यक्ष गुरुनाथ सामंत, सचिव गजानन परब, शंकर आळवे,आशिष परब, तुकाराम परब, सुनील आळवे, अमित फाटक, प्रमोद परब, समीर भोजणे आदी उपस्थित होते.










