उबाठा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २३ ला कुडाळ इथं बैठक

शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव, अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 20, 2025 18:03 PM
views 16  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. २३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुडाळ एम. आय. डी. सी रेस्ट हाऊस येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होणार असून जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा ते आढावा घेणार आहेत. याबाबतची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.