
सिंधुदुर्गनगरी : गावराई ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर उपसरपंच आणि सदस्यांनी घातलेल्या अविश्वास ठरावात जनशक्तीने (ग्रामस्थानी) सरपंच सोनल शिरोडकर यांना त्यांच्या बाजूने २३५ तर उपसरपंच संतोष सामंत आणि सदस्य यांच्या बाजूने २१० मते दिली. गावराई ग्रामसभेने सरपंच सोनल शिरोडकर यांचे सरपंच पद अबाधित ठेवले आहे.
कुडाळ तालुक्यातील गावराई ग्रामपंचायत सरपंच सोनल शिरोडकर यांच्यावर उपसरपंच संतोष सामंत आणि सदस्यांनी अविश्वास दाखल केला होता .सहा सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वासाची तहसीलदार कुडाळ यांनी रितसर बैठक घेतली असता सदस्यांनी केलेला अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता. शासनाच्या नव्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत सरपंच हे गावातून निवडून दिले जात असतात त्यामुळे याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे पूर्वी सदस्या मधूनच सरपंचांची निवड होत असे त्यानुसार त्यानंतर तहसीलदार कुडाळ यांनी पारित झालेला ठरावानुसार प्रस्ताव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सादर केला होता. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सदर गावातील ग्रामपंचायत सरपंच ग्रामस्थांमधून निवडून आल्यामुळे विशेष ग्रामसभा आयोजन करावे या दृष्टीने ११ नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित केली होती. त्यानुसार गावातील ग्रामस्थ विरुद्ध ग्रामपंचायत सदस्य यांच्याबाबत कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी तथा निवडणूक अधिकारी प्रफुल्ल वालावलकर ,सजय ओरोसकर ,गजानन धर्णे ,महादेव खरात सोनीया पांजरी व ग्राप अधिकारी प स कर्मचारी यांच्या उपस्थितीत निवडणूक पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री लव्हे व पोलीस यांच्या बंदोबस्तात ही विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेस ग्रामस्त मतदारानी उस्फूर्त प्रतिसाद दिला .गावराई निवडणूक मतदान बुथ मधील तीन वार्डाच्या रचनेप्रमाणे झालेल्या मतदानात एकूण ४६७ मतदानापैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने २१० व अविश्वास ठरावाच्या विरोधात २३५ तर २२ मते बाद झाली. एकूण ४६७ मतदानामध्ये सरपंच सोनल शिरोडकर २५ मतांनी विजयी झाले . आहेत .विजयीउमेदवार आणि ग्रामस्थांचे माजी जि प अध्यक्ष काका कुडाळकर,विभाग अध्यक्ष परशुराम परब, कसाल सरपंच राजन परब,पावशी सरपंच पल्लवी पावसकर ,स्वप्निल गावडे,यानी अभिनंदन केले .










