
सिंधुदुर्गनगरी : साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि. 3 डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा तसेच दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये,क्रीडा क्षेत्रामध्ये, रोजगार स्वयंरोजगार क्षेत्रामध्ये, सामाजिक योगदान, विशेष प्रतिभावंत व प्रेरणादायी व्यक्ती तसेच आयुष्य गौरव पुरस्कार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तीनी आपली संपूर्ण माहिती अध्यक्ष अनिल शिंगाडे, साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, तालुका कुडाळ, जिल्हा: सिंधुदुर्ग, मोबाईल 9765979450 या पत्यावर दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पाठवावी, असे आवाहन सिंधुदुर्ग साईकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.










