
सिंधुदुर्ग : सदर वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तसेच सद्भावना दिवसाचे औचित्य साधून समाजात एकोपा आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे ‘वॉक - रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आला असून, एकूण 5 किलोमीटर अंतराची वॉक- रन पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे प्रारंभिक ठिकाण होमगार्ड कार्यालय, सिंधुदुर्गनगरी (ओरोस) असेल.
सहभागी नागरिकांनी सकाळी 5.30 वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले असून, हा उपक्रम समाजातील ऐक्य, सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरणार आहे.










