
सिंधुदुर्गनगरी : ग्रामपंचायत सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर व डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कसाल यांच्या सहकार्याने कसाल ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कसाल यांना गावातील ज्येष्ठ नागरिकांनसाठी पेशंट बँक प्रदान करण्यात आली.
या अंतर्गत कॉट, व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर, ट्रा य पॅक, स्टिक तसेच सेमीफउर बेड देण्यात आलं. या कार्यक्रमाला डॉक्टर विद्याधर तायशेटे, कसाल सरपंच राजन परब, डॉक्टर प्रशांत कोलते, सचिन मदने,सत्यवान चव्हाण, अरुण मालणकर,नवीन बांदेकर, पोलीस पाटील अनंत कदम, श्री आळवे सर,अवधुत मालणकर, व्हिटर फर्नांडिस, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम कसाल ग्रामपंचायत मध्ये पेशंट बँक सुरू करण्यात आली या माध्यमातून जे जेष्ठ नागरिक आहेत त्यांना या वस्तूंचा लाभ कसा देता येईल यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहे. या उपक्रमाला ग्रामपंचायत कसालच्या वतीने एक व्हील चेअर जेष्ठ सेवा संघाला देण्यात आली बाकीच्या वस्तू ह्या डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी दिल्या. या वस्तू जे गरीब ज्येष्ठ नागरिक पेशंट असतिल त्यांना विनामूल्य वापरण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस व जास्तीत जास्त एक महिना देण्यात येणार आहेत.
या योजनेचा फायदा या परिसरातील जे गरजू जेष्ठ नागरिक असतील त्यांनी घ्यायचा आहे यानंतर दर महिन्याला कसाल ग्रामपंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब व शुगर तपासणी होणार आहे त्यांना लागणारी औषध उपचार या ठिकाणी मोफत केली जाणार असल्याचे सरपंच राजन परब यांनी सांगितले. या उपक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि आपल्याकडून जास्तीत जास्त ज्या गोष्टी देता येतील त्या देऊ असे आश्वस्थ केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कसाल रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर तसेच ज्येष्ठ सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश वनकर,सचिव अशोक पारकर यांनी सहकार्य केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियान अंतर्गत हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतल्याबद्दल ज्येष्ठ सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे आभार या ठिकाणी व्यक्त केले.










