
सिंधुदुर्गनगरी : कसाल बाजारपेठ येथील रहिवासी आणि बाजार पेठेतील श्री सिद्धिविनायक वाॅच गॅलरीचे मालक व्यावसायिक साईनाथ आंबेरकर यांचे वडील प्रभाकर उर्फ आप्पा आंबेरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
कसाल ग्रामपंचायत सदस्य पूजा आंबेरकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी ४ वाजता येथील स्मशान भूमीत अंत्य संस्कार होणार आहेत. सरबतवाले आप्पा म्हणून ते परिचित होते.










