
सिंधुदुर्गनगरी : सांगली येथे पार पडलेल्या शालेय विभागीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी येथील जलतरणपटूनी घवघवीत यश मिळविले आहे. स्वरा पालव, अथर्व सावंत, मानस बांदेलकर, हर्षवर्धन शिसाळे या चार विद्यार्थ्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे लातूर येथे १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत
सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या शालेय विदयार्थ्यांनी शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनाय मार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत यश मिळविल्यानंतर कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती सांगली येथे ८ व ९ ऑक्टोबर रोजी विभागीय स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील सर्वच विदयार्थ्यांनी चमकदार कामगीरी करत जलतरण स्पर्धेत यश मिळविले त्यातील चार जलतरणपटूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
शालेय विभागीय जलतरण स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
स्वरा उल्हास पालव
50 मीटर 100 मीटर 200 मीटर बटरफ्लाय या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक
अथर्व दिनेश सावंत 50 मीटर 100 मीटर 200 मीटर
ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये
द्वितीय क्रमांक
स्वरा संदीप गावडे
100 मीटर बॅक स्ट्रोक
तृतीय क्रमांक
400 फ्री स्टाईल चौथा क्रमांक
200 बॅक स्ट्रोक चौथा क्रमांक
स्वराज बाळा सावंत
100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
तृतीय क्रमांक
200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
चौथा क्रमांक
वेदांत विनायक फोपळे
200 बॅक स्ट्रोक तृतीय क्रमांक
100 बॅक स्ट्रोक चौथा क्रमांक
मार्क जॉन्सन डिसूजा
800 मीटर फ्रीस्टाइल पाचवा क्रमांक
गौरव योगेश लाड
50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
चौथा क्रमांक
हर्षवर्धन शिसाळे
50 ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक
100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक तृतीय क्रमांक
50 मीटर फ्रीस्टाइल तृतीय क्रमांक
मानस विद्याधर बांदेलकर
50 मीटर बटरफ्लाय द्वितीय क्रमांक
1500 मीटर फ्रीस्टाइल तृतीय क्रमांक
या सर्व स्पर्धकांना सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलाव येथोल प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे प्रशिक्षण लाभले आहे या स्पर्धकांचे जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ , जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी शीतल शिंदे, क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.










