
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद पूरक प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक क्र. ०१ येथे शिक्षकांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे शैक्षणिक गोंधळ निर्माण झाला आहे. शाळेतील तीन शिक्षक — श्रीमती स्मिता संजय गवस, श्रीमती रिया मयुरी आळवेकर आणि श्रीमती स्वप्नाली सतीश शिंदे — यांची दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी बदली होऊन त्यांनी नवीन शाळांमध्ये रुजू झाल्याने सध्या शाळा शिक्षकांविना झाली आहे. या शाळेचा विद्यार्थी पट २३८ इतका मोठा असून सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत कोणताही बदलीतून आलेला शिक्षक शाळेत हजर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी ८ ऑक्टोबर रोजी शाळाबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश दत्ताराम ओरोसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रथम सत्र परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. तरीही आमच्या शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून, प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी शिक्षक नियुक










