सिंधुदुर्गनगरी येथिल जलतरणपटूंची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 03, 2025 19:31 PM
views 60  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये सराव करणाऱ्या जलतरणपट्टूनी घवघवीत यश मिळविले आहे त्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे  सांगली येथे 8 व 9 ऑक्टोबर रोजी या विभागीय स्पर्धा होणार आहेत.

जिल्हा क्रीडा विभागामार्फत सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत जिल्हा भरातून स्पर्धत सहभागी झाले होते या स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावात विविध शाळामधून सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.त्याचा निकाल पुढील प्रमाणे

14 वर्षाखालील मुले

वेदांत विनायक फोपळे

वराडकर हायस्कूल कट्टा मालवण

 400 मीटर फ्रीस्टाइल 100 मीटर बॅकस्ट्रोक 200 मीटर बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारात - प्रथम क्रमांक

अथर्व दिनेश सावंत 

डॉन बॉस्को स्कूल ओरोस 

 50 मीटर 100 मीटर 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारात -प्रथम क्रमांक 

स्वराज बाळा सावंत 

 विद्यानिकेतन स्कूल कसाल 

50 मीटर 100 मीटर 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारात- द्वितीय क्रमांक

अथर्व जितेंद्र पेडणेकर 

डॉन बॉस्को स्कूल ओरस 

50 मीटर 100 मीटर 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारात-तृतीय क्रमांक 

आर्यन केशव भिसे 

 जिल्हा परिषद शाळा सुकळवाड मालवण 

50 मीटर फ्रीस्टाइल- तृतीय क्रमांक 

साईराज शंकर गाड  

डॉन बॉस्को स्कूल ओरस 

100 मीटर 200 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात- तृतीय क्रमांक 

व 50 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात-द्वितीय क्रमांक 

14 वर्षाखालील मुली -

स्वरा संदीप गावडे 

श्री शिवाजी हायस्कूल पणदूर

400 मीटर फ्रीस्टाइल 100 मीटर बॅक स्ट्रोक 200 मीटर बॅक स्ट्रोक या तिन्ही प्रकारामध्ये- प्रथम क्रमांक 

स्वरा उल्हास पालव

डॉन बॉस्को स्कूल ओरोस 

50 मीटर 100 मीटर 200 मीटर बटरफ्लाय या तिन्ही प्रकारांमध्ये -प्रथम क्रमांक

डेलीशा संदीप सावंत 

एस एम हायस्कूल कणकवली 

50 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात-चतुर्थ क्रमांक 

17 वर्षाखालील मुले-

मार्क जॉन्सन डिसूजा 

डॉन बॉस्को स्कूल ओरस 

100 मीटर बॅकस्ट्रोक व 

400 मीटर फ्री स्टाईल 800 मीटर फ्रीस्टाइल या तिन्ही प्रकारात-प्रथम क्रमांक

देवांशू राहुल वेंगुर्लेकर 

डॉन बॉस्को स्कूल ओरोस 

50 मीटर 100 मीटर 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारात-प्रथम क्रमांक

गौरेश योगेश लाड 

डॉन बॉस्को स्कूल ओरोस 

50 मीटर व 100 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात प्रथम क्रमांक

 व 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात-द्वितीय क्रमांक

ओंकार अजित कानशिडे कुडाळ कॉलेज कुडाळ 50 मीटर व 100 मीटर फ्रीस्टाइल या दोन्ही प्रकारात-द्वितीय क्रमांक

19 वर्षाखालील मुले

मानस विद्याधर बांदेलकर 

डॉन बॉस्को स्कूल ओरोस 

400 मीटर व 1500 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात प्रथम क्रमांक व 50 मीटर बटरफ्लाय या प्रकारात-प्रथम क्रमांक

19 वर्षाखालील मुली 

तृप्ती गुरुदत्त दळवी 

श्री शिवाजी हायस्कूल पणदूर 

50 मीटर 100 मीटर 

ब्रेस्ट स्ट्रोक  व 50 मीटर फ्री स्टाइल या तिन्ही प्रकारात-प्रथम क्रमांक

या सर्व स्पर्धकांना सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावाचे कंत्राटदार व प्रशिक्षक  प्रवीण सुलोकार यांचे प्रशिक्षण लाभले हे सर्व स्पर्धक या जलतरण तलावावर अनेक दिवसांपासून सराव करीत आहेत. या सर्व स्पर्धकांना जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ , जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी शीतल शिंदे,माधुरी घराळ क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ यांनी अभिनंदन करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.