नवनगर रहिवाशी संघाचे उपक्रम कौतुकास्पद

प्राधिकारणमधील रहिवाशाचे जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न करणार : अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 03, 2025 19:22 PM
views 42  views

सिंधुदुर्गनगरी : अलीकडील काळात जेष्ठाकडे दुर्लक्ष केला जातो मात्र सिंधुदुर्गनगरीतील नवनगर प्राधिकरण रहिवाशी संघाने जेष्ठाचा सत्कार करुंन आदर भाव व्यक्त केला तसेच विविध उपक्रम राबविले हे कौतुकास्पद आहे येथील रहिवाशीच्यांना चांगल्या सुविधा देवून जीवन सुखकर बनविण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण रहिवासी संघामार्फत प्राधिकरण क्षेत्रातील दहावी, बारावी, पदवीप्राप्त गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्रीडा ,कला क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या सत्कार समारंभ नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे बोलत होत्या यावेळी महसूल विभागाच्या तहसीलदार चैताली सावंत, प्राधिकरणचे अधिकारी श्री येडके,  नवनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष आदेश नाईक, उपाध्यक्ष उल्हास पालव, अशोक रासम, चंद्रकांत पाटकर, दाजी वारंग, संतोष बांदेकर, संदीप गावडे, वनिता जुवेकर, दीप्ती धालवलकर राजश्री नाईक उपस्थित होते.

श्रीमती साठे पुढे बोलताना म्हणाल्या की नवनगर राहिवशी संघाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न करता विविध उपक्रम राबविले आहेत लहान मुलाच्या कला गुणांना संधी दिली , जेष्ठा प्रति आदर भाव व्यक्त केला,विविध व्यक्तीचा गौरव केला आणि येथील समस्या सोडविण्यासाठी सतत हा रहिवासी संघ झटत असतो हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे येथील नवनगर मधील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरण समिती निश्चितपणे प्रयत्न करेल व चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. 

चैताली सावंत बोलताना म्हणाल्या की आपण प्राधिकरणमधे रहात असल्याने येथील समस्या आपल्याला माहिती आहेत त्यामुळे प्राधिकारणची लवकरच एक बैठक होणार आहे त्यात सर्व समस्या मांडून जिल्हाधिकाऱ्या मार्फत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू आणि सिंधुदुर्गनगरीतील रहिवाशांचे जीवन सुखकर बनवू असे सांगितले 

यावेळी व्यासपीठावरील विविध मान्यवारांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक अध्यक्ष आदेश नाईक यांनी केले यावेळी त्यांनी प्राधिकरण मधील कामांचा आढावा घेतला व राहिलेल्या समस्या अप्पर जिल्हाधिकारी सोडवतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी अशोक रासम यांनी आभार व्यक्त केले सूत्रसंचालन सौ राजाध्यक्षा मॅडम यांनी केले