
कुडाळ : भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी छोटू पारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिफारशीने ही महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली आहे.
या निवडीच्या निमित्ताने ओरोस मंडल आणि छोटू पारकर मित्रमंडळ यांच्या वतीने छोटू पारकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कार समारंभासाठी भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य उदय जांभवडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्या तवटे, ओरोस मंडल अध्यक्ष आनंद सावंत, ओरोस मंडल महिला अध्यक्ष सुप्रिया वालावलकर तसेच सुनील जाधव, अमित भोगले, योगेश तावडे, हार्दिक शिगले, सुशील निब्रे, राजू परब, आनंद बागवे, नंदू तळकटकर, मनीष पारकर आणि इतर पदाधिकारी व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितांनी छोटू पारकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










