
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनरेगा विभागातील ग्रामपंचायत मध्ये काम करत असलेल्या ग्रामरोजगार सहायक संघटनेचे मागील एक वर्षांपूर्वी झालेल्या शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2024 नुसार मासिक फिक्स 8000 मानधन वैयक्तिक खात्यात अद्याप मिळाले नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सहायक संघटनेतर्फे कामबंद आंदोलन सुरू आहे.
परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण आमदार निलेश नारायण राणे यांनी आज ग्रामरोजगार सहायक संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून ग्रामरोजगार सहायक यांचे प्रश्न व समस्या तात्काळ या योजनेचे रोहयोमंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहायक यांचे प्रलंबित असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे तसेच मजुरांची मजुरी साहित्याची रक्कम असा प्रलंबित निधी देखील दोन दिवसात देण्याची मागणी केली. तसेच फिक्स मानधन बाबत देखील लवकरच मंत्रालय मध्ये मनरेगा बाबत माहिती घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले प्रश्न व समस्या सोडविण्याची जबाबदारी व खात्री दिली असून सध्या सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात यावे असे आवाहन केले.
त्यामुळे निलेश राणे यांच्या सूचनेवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहायक संघटनेचे कामबंद आंदोलन मागे घेत आहोत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा उपनेते संजय आंग्रे , रत्नाकर जोशी व इतर पदाधिकारी तसेच ग्रामरोजगार सहायक संघटनेचे जिल्हा सचिव विष्णु माणगावकर, जिल्हा संघटक प्रसन्ना म्हाडगुत मीडिया प्रमुख अनिकेत पाटकर कुडाळ सचिव रोशन पोखरणकर , बाजीराव जोशी, केशव गावडे, विश्वनाथ हळदनकर,दत्तप्रसाद ढवळ इत्यादी ग्रामरोजगार सहायक उपस्थित होते.










