सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या खेळ पैठणीच्या मानकरी प्राची बोर्डवेकर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 29, 2025 16:09 PM
views 148  views

सिंधुदुर्गनगरी :  कसाल येथील श्री देव सिद्धिविनायक मंदिर येथे  श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित  नवरात्र उत्सवानिमित्त खेळ पैठणीचा ची नाथ व पैठणी विजेत्या ठरल्या सौ प्राची ओंकार बोर्डवेकर तर उपविजेत्या ठरल्या सौ सलोनी सुरेश नांदीवडेकर कसाल बाजारपेठ तालुका कुडाळ येथील श्री देव सिद्धिविनायक मंदिरात प्रतिवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या वर्षीही हा उत्सव साजरा करण्यात आला असून,या निमित्त मातृषक्ती साठी खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.सुरुवातीपासूनच रंगत गेलेल्या या खेळात एकूण २८ वहिनींनी सहभाग घेतला होता.या खेळाचे उत्कृष्ट असे सूत्र संचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

या खेळात सौ प्राची बोर्डवेकर आणि सलोनी नांदीवडेकर या अंतिम खेळात एकमेका समोर उभारल्या अंतिम खेळात सौ प्राची बोर्डवेकर यांनी बाजी मारत या खेळा साठी प्रथम विजेत्याला ठेवण्यात आलेली नथ आणि पैठणी पटकावली तर सौ सलोनी नांदिवडेकर यांना द्वितीय क्रमांकाच्या पैठणी वर समाधान मानावे लागले.या खेळात सहभागी सर्व वहिनींना सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीने संध्या पावसकर यांच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आल्या.त्याचबरोबर विजेत्या सौ प्राची यांना सोन्याची नथ व पैठणी सोन्याची नथ प्रायोजक कसाल येथील मालणकर ज्वेलर्सचे  तुषार मालणकर सौ ऐश्वर्या मालनकर यांनी सुपूर्द केली.

या उत्सवावेळी सिद्धिविनायक मंडळाचे अध्यक्ष नवीन बांदेकर तसेच उमेश पावसकर,अवदूत मालणकर, दिनेश बांदेकर,चिराग  पावसकर, तसेच सिद्धिविनायक मित्रमंडळाचे श्रीनिवास कांदळकर,वैभव बांदेकर,भानुदास बांदेकर,बाळा बांदेकर,साई बांदेकर,अमोल गावडे,निखिल बांदेकर ,गंधार भिसे ,सुशील वालावलकर, दुर्वांक पावसकर, श्रवण आंबेरकर आदि उपस्थित होते.