
सिंधुदुर्गनगरी : खाजगी क्षेत्रात लघु, सुक्ष्म, मध्यम व मोठ्या उद्योजकांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्ठीकोनातून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे विद्यमाने 8 ऑक्टोबर 2025 रोजी बीकेसी ग्राऊंड बांद्रा येथे सकाळी 9 वाजता नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. नमो महारोजगार मेळाव्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त श्री. येरमे यांनी दिली आहे.
नमो महारोजगार मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रतेचे मनुष्यबळ जागीच व विना विलंब उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छूक उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी आपणाकडे असणाऱ्या रिक्तपदांचा तपशील या कार्यालयास विहित नमुन्यात (Notification Form) sindhudurgrojgar@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात यावा. आपले नोटीफिकेशन प्राप्त झाल्यास मनुष्यबळ आमंत्रित करणे, नमो महारोजगार मेळाव्यात आपल्या आस्थापनेस स्टॉल (जागा) निश्चित करणे, प्लेक्स व माहितीपत्रकामध्ये आस्थापनेचे नाव समाविष्ट करणे शक्य होईल व आपणास आपल्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नमो महारोजगार मेळावा दिनांक 8 ऑक्टोबर 2025 मध्ये आपल्याकडील रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करावीत. या संधीचा जिल्ह्यातील उद्योजक तसेच उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- ०२३६२-२२८८३५ किंवा ईमेल आयडी:- sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.










