संपूर्णा कारंडे यांची लोकअदालत विषयावर शुक्रवारी मुलाखत

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 11, 2025 12:09 PM
views 140  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव संपूर्णा कारंडे उर्फ गुंडेवाडी यांची लोकअदालत या विषयावर शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी आकाशवाणीवर मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्गनगरी आकाशवाणीच्या एफ एम १०३.८ मेगाहाईट्स किंवा NewsOnAir अँप वर ऐकता येणार आहे आकाशवाणीच्या प्राची पालव यांनी ही मुलाखत घेतली असून डॉ. सुनील गायकवाड यांनी सादर केली आहे.