
सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम वर्ष बी.फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बी.फार्मसी अभ्यासक्रमाचे स्वरूप, परीक्षा पद्धत, कॉलेज स्टाफची ओळख, संस्थेची ध्येयधोरणे तसेच कॅम्पसमध्ये पाळायची शिस्त यासंबंधीची माहिती देण्यात आली
चालू वर्षी बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया बरीच लांबल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी स्वतः यावेळी उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी दशेत आचरण कसे असावे यासंबंधी मार्गदर्शन केले. शिस्त, सातत्य आणि अभ्यासावर फोकस या तीन गोष्टी कसोशीने पाळल्यास सर्वांचे भवितव्य नक्कीच उज्वल आहे असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.याप्रसंगी बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे उपस्थित होते. प्रा.रश्मी महाबळ यांनी विस्तृत स्वरूपात संस्थेची माहिती दिली. निवेदन प्रा.गौरी भिवशेठ यांनी केले.