
सावंतवाडी : दीपक भाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी आणि शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आयोजित ''भव्य भजन महोत्सव 2024'' च आयोजन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १८ जुलै रोजी करण्यात आलं आहे.
शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ व दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भजन महोत्सव विधानसभा मतदारसंघ मर्यादित असेल. या महोत्सवात मतदारसंघातील सर्व भजनी मंडळानी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे. स्पर्धा प्रकार संगीत भजन स्पर्धा असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही गावातील भजन मंडळ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकते. 'स्पर्धेचे स्वरूप हे स्पर्धा प्रथम ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येतील. त्यासाठी सहभागी होणाऱ्या भजन मंडळास प्रथम आपल्या भजनाचा दहा मिनिटांचा व्हिडिओ टेलिग्राम नंबरला पाठवायचा आहे. प्राप्त झालेल्या व्हिडिओचे परीक्षकांमार्फत परीक्षण करून उत्कृष्ट 21 संघ निवडले जातील. त्या निवडलेल्या 21 संघांची प्रत्यक्ष भजन स्पर्धा सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये 26 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. प्राथमिक फेरी व्हिडिओ स्वरूपात व अंतिम फेरीतील भजने प्रत्यक्ष स्वरूपात होतील.
ऑनलाईन सादरीकरण व्हिडीओ पाठविण्याचा अंतिम 20 जुलै 2024 रात्री 12.00 वाजेपर्यंत आहे. 'अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघाना प्रत्यक्ष सादरीकरणाचा दिनांक 26 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 'असून प्रत्यक्ष भजन स्पर्धेचे स्थळ हे विठ्ठल मंदिर सावंतवाडी असणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रुपये 33333/- प्रमाणपत्र व चषक, द्वितीय क्रमांक -रोख रुपये 22222/- प्रमाणपत्र व चषक, तृतीय क्रमांक- रोख रुपये 11111/- प्रमाणपत्र व चषक, उत्तेजनार्थ पहिला रोख रुपये 5555/- प्रमाणपत्र व चषक. उत्तेजनार्थ दुसरा रोख रुपये 3333/- प्रमाणपत्र चषक देण्यात येणार आहेत. 'संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट पखवाज वादक उत्कृष्ट तालरंक्षक यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.