
कुडाळ : कुडाळ शहर, तालुक्यातील होतकरू उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता चित्रकला संदर्भातील कलात्मक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेला देशपातळीवरील विख्यात चित्रकार, शिल्पकार नामानंद मोडक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी आरोग्य त्यातील सर्वसामान्यांचे देवदूत डॉ.प्रमोद वालावलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कुडाळ तालुकास्तरीय चित्रकलेचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेमध्ये पाचवी पासून पुढील विद्यार्थांना सहभाग घेता येणार आहे.तसेच सहभागी होण्यासाठी १०० रुपये अनामत रक्कम खालील दिलेल्या QR कोडवर भरावी लागेल.कार्यशाळा समाप्तीनंतर अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव,पत्ता व व्हॉटसॲप नंबर आवश्यक आहे. खालील लिंक ओपन करून अर्ज भरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर अर्जाची लिंक 26 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. https://forms.gle/ba8oZZK1pwvpAqge6
अधिक माहितीसाठी विष्णू माणगावकर मोबा. ९७३०१९२२७६ , धोंडू रेडकर गुरुजी मोबा.९४२०९६३०५४ यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून चित्रकार श्री. मोडक आहेत. या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ प्रमोद वालावलकर हितचिंतकाकडून करण्यात आले आहे. डॉ प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ येथील श्री देवी केळबाई मंदिरात तालुकास्तरीय चित्रकला आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. 392 विद्यार्थी सहभागी झाले होते.या कार्यशाळे दरम्यान, या तालुकास्तरीय चित्रकलेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धकानी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे.










