
सावंतवाडी : नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइड सिंधुदुर्ग, भटवाडी सावंतवाडी या संस्थेतर्फे आयोजीत दृष्टीबाधितासाठी स्नेह मेळावा शनिवार २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नॅब सभागृह, नॅब नेत्र रूग्णालय, सावंतवाडी येथे आयोजीत केला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सिंधदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे व जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षा मृणालिनी क्शाळीकर उपस्थित राहणार आहेत. नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्गच्या सर्व लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाकरीता अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन नॅब सस्थेचे अध्यक्ष अनंत उचगांवकर व सचिव सोमनाथ जिगजीन्नी यांनी केले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याऱ्या सर्व लाभार्थ्यांना येण्याजाण्याचा एसटीचा प्रवासखर्च संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.