कणकवली कॉलेज इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन

Edited by:
Published on: February 28, 2025 21:31 PM
views 132  views

सिंधुदुर्गनगरी :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. ५ मार्च २०२५ रोजी  कणकवली कॉलेज कणकवली येथे "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी  या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इ.सि. शेख यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उमेदवरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योजकांना  आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजक/ इंडस्ट्रिजना या रोजगार मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या"मध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker ) उमेदवारांनी पोर्टलवर अधिसूचित रिक्तपदांसाठी आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे. तसेच दि. 5 मार्च 2025 रोजी  "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात" कणकवली कॉलेज कणकवली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  शेख यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  कार्यालयाच्या 02362 228835/ 9403350689 किंवा ईमेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com  यावर संपर्क करावा.