आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 16, 2023 18:41 PM
views 86  views

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२३ जुन २०२३ रोजी स. १०.०० ते दु. ०३.०० या वेळेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे मोफत वैद्यकिय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, अल्सर, थायरॉईड, मुळव्याध, मुतखडे, प्रोस्टेट ग्रंथी, मोतिबिंदू, चरबीच्या गाठी, टॉन्सिल्स, पित्ताशयातील खडे, कान, नाक, घसा, गर्भाशयाचे आजार, त्वचा रोग तपासणी इ. आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार असून आवश्यक असल्यास पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहेत. तरी गरजुंनी श्री. प्रविण पेडणेकर ८२७५५२४६१६, श्री. सुधिर नकाशे ७७४३९८६०८८, श्री. राजेंद्र राणे ७७७३९३७०७०, श्री. संजय रावराणे- ९४२२३७९३४५, श्री. राजु पवार ९६५७२५९०८० यांच्याकडे आपली नांव नोंदणी करावी.

वैभववाडी येथे होत असलेल्या मोफत वैद्यकिय आरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिबिराचा लाभ गरजूंनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव श्री.प्रमोद रावराणे यांनी केले आहे.