
सिंधुदुर्ग : जिल्हा कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दुष्टीने रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळाव्याचे आयोजन 30 सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावर्डे येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये जिल्हातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थाकडील विविध आस्थापना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड करण्यात येणार आहेत. त्याकरीता जिल्हात्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्था यांना मेळाव्याकरीता निमंत्रित करण्यात आले आहे.
उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरीता बायोडाटा ०५ प्रतीत व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे करावी. नाव नोंदणी करणे कोणाला शक्य न झाल्यास त्यांनी सुध्दा मेळाव्यास उपस्थित रहावे. मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9405071361/8888664053 या क्रंमाकावर संपर्क करावा. सदर मेळाव्याकरीता जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन उमेश शशिकांत लकेश्री , प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे यांनी केले आहे.