
सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा रक्तदाता संघटनेकडून रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये १८ जुलैला हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल आहे. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीची टीम या शिबीरात सहभागी होणार आहे. या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदानासारख पवित्र दान करावं असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे.