
सावंतवाडी : श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने "कै. गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त व 8 मार्च रोजी असलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता खास विवाहित महिलांसाठी भावगीत स्पर्धेचे आयोजन कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात करण्यात आले आहे. तसेच त्या नंतर सायंकाळी ठीक 5:00 वाजता सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडीच्या नवोदित व यशस्वी विद्यार्थ्यांचा सवेश नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
भावगीत गायन स्पर्धेमध्ये संगीताची आवड असलेल्या व नवोदित संगीत शिक्षण घेत असलेल्या महिला स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.ही स्पर्धा केवळ विवाहित महिलांसाठी असून वयाची कोणतीही अट नाही. अल्बम मधील व चित्रपटातील भावगीते स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. गीत गायनासाठी प्रत्येकी 6 मिनिटांचा वेळ दिला जाईल, नावनोंदणी करणाऱ्या प्रथम 25 जणींना स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेची प्रवेश फी 100 रुपये स्पर्धेच्या ठिकाणी जमा करावी .स्पर्धेसाठी नवनोंदणी अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे. नावनोंदणी साठी खालील नंबर वर संपर्क सौ.आशा मुळीक 9420740854 यांना करावा. स्पर्धेत इच्छुक महिलांनी सहभाग घ्यावा तसेच सर्वं रसिकानी स्पर्धेस व सवेश नाट्यगीत गायन मैफिलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष गुरुवर्य निलेश मेस्त्री यांनी केले आहे.