
सावंतवाडी : स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीन सावंतवाडी शहरात शिवस्वराज्य यात्रेच आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही या भव्यदिव्य रॅलीच आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त दरवर्षी भव्यदिव्य अशी रॅली स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीन आयोजित करण्यात येते. यंदाही १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. या रॅलीच आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. शहरातून ही रॅली मार्गस्थ होणार आहे. या रॅलीत विविध ऐतिहासिक देखावे, चित्ररथांसह खास आकर्षण असणार आहेत. भगवे झेंडे, भगवे फेटे अन् बाईक रॅली ही खास आकर्षण असणार आहे. या रॅलीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीन करण्यात आले आहे