आरमारी गाबीत समाजाच्या वतीने किल्ला - आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 31, 2023 20:01 PM
views 282  views

मालवण : आरमारी गाबीत समाजाच्या वतीने दिवाळी निमित्त 13 नोव्हेंबर रोजी मालवण शहर मर्यादित किल्ला व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चौदा वर्षाखालील आणि खुला अशा दोन गटांसाठी असणार आहे. 

स्पर्धेसाठी कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती असणे आवश्यक आहे. त्यासाठी शाडू माती किंवा वाळूचा वापर करावा. तर आकाश कंदीलसाठी प्लास्टिकचा वापर करू नये.  विजेत्या स्पर्धकांना खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक रोख ३००१ द्वितीय २००१, तृतीय १००१. लहान गटासाठी प्रथम २००१, द्वितीय १००१, तृतीय ७०१ आणि स्मृतिचिन्ह तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धा १२ नोव्हेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे आहे. तरी स्पर्धकांनी १० नोव्हेंबर पर्यंत दामाजी मेथर - 9422964163, स्वप्नाली तारी - 9423292247, निशिकांत पराडकर - 8999749185 यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन आरमारी गाबीत समाजाचे अध्यक्ष अविनाश कुबल यांनी केले आहे. यावेळी अविनाश कुबल व उपाध्यक्ष सुर्यकांत खवळे, उपाध्यक्ष गणेश बांदकर, सचिव सतीश धुरत उपसचिव रविंद्र कोयंडे, खजिनदार तुकाराम मोंडकर, सदस्य सुनिल जोशी, महेश विठोबा जुवाटकर, हरिश्चंद्र मोंडकर, शरद कोयंडे, गणेश फडके आदी उपस्थित होते.