वैभववाडी : आचिर्णे येथील श्री रासाईदेवीचा जत्रोत्सव सोमवार दि. 13 जानेवारी 2025 रोजी होत आहे. यानिमित्ताने जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रोख रक्कमेसह चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १०हजार व चषक, द्वितीय ७हजार व चषक,तृतीय ५हजार व चषक तसेच उत्तेजनार्थ प्रथम - तीन हजा व चषक,उत्तेजनार्थ द्वितीय - रूपये दोन हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेकरिता जिल्ह्यातील प्रथम नोंदणी करणाऱ्या १५ संघांना प्रवेश दिला जाईल. सदर स्पर्धा ही सायंकाळी ठीक ७वाजता सुरू होईल. अधिक माहितीसाठी बयाजी बुराण 94 21 14 4605 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.