
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीमध्ये स्व.राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा ५वी ते ७वी व ८वी ते १०वी या दोन गटात घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व राजमातांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. तद्नंतर मान्यवरांच्या स्वागताने व राजमातांच्या स्मृतींना उजाळा देऊन स्पर्धेचा प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून बहूसंख्य शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्हयातील विविध शाळांमधून इयत्ता ५वी ते ७वी या गटात एकूण १९ विद्यार्थी तर ८वी ते १०वी या गटात एकूण २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. ५वी ते ७वी गटात प्रथम क्रमांक कु. चिन्मय विक्रम कोटणीस (इ. ७वी) कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी, द्वितीय क्रमांक कु. गायत्री शशिकांत सावंत (इ. ७वी) श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव व तृतीय क्रमांक कु. हर्षदा गणेश जोशी (इ. ६वी) गजानन विदयालय, पाट कुडाळ तर ८ वी ते १०वी गटातून प्रथम क्रमांक कु. साक्षी मोहन दळवी (इ. ८वी) नेमळे हायस्कूल, द्वितीय क्रमांक कु. अस्मि प्रविण मांजरेकर (इ. ९वी) राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी व तृतीय क्रमांक कु. युक्ता प्रसाद सापळे (इ. १० वी) मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी हे स्पर्धक विजयी ठरले. स्पधेचे परीक्षण प्रा. माणिक बर्गे, प्रा. कविता तळेकर, प्रा. सुप्रिया केसरकर व प्रा. हर्षदा परब यांनी केले. संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने व पसायदानाने झाला. यावेळी संस्था सदस्य जयप्रकाश सावंत, मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक अस्मिता परब, सूत्रसंचालन श्रृती जोशी तर आभार रमणी गावडे यांनी मानले. समारोप गोविंद प्रभू यांनी केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व सहभागी स्पर्धकांचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ व माता पालक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.