कणकवलीत RTOच्या मनमानी कारभाराला राजकीय पक्षांचा विरोध

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 18, 2023 12:46 PM
views 80  views

कणकवली :  कणकवली तहसिल कार्यालय परिसरात दुचाकी घेवून आलेल्या नागरिकांवर चुकीच्या पध्दतीने हॅल्मेट नसल्याचे कारण देवून 5 हजार , 3 हजार अशी दंडात्मक कारवाई सुरु केली होती. या चारही आरटीओ अधिका-यांना युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया पारकर यासह नागरिकांनी जाब विचारला.

संबंधित अधिका-यांनी तहसिलदारांना कळवून ही कारवाई करत असल्याचे सांगितले . त्यानंतर सर्वच जण तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांच्या दालनात गेले. त्याठिकाणी कुठलीही परवानगी न घेता ही कारवाई केल्याचे उझड झाले . त्यावेळी भाजपा युवामोर्चा अध्यक्ष संदिप मेस्त्री हे देखील आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरटीओ ची मनमान रोखण्यासाठी दंड रद्द करण्याची मागणी केली. अखेर या वादावर कारवाई बाबत तहसिलदारांनी प्रिवियन्स रिपोर्ट करण्याचे सुचवले आणि पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी सचिन सावंत , राजु शेटये , संतोष पुजारे , भाजपाचे महेश लाड , पप्पू यादव समीर प्रभुगांवकर यांच्यासह दोन्ही पक्षाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकारी व कार्कर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची कणकवली तहसिल कार्यालय परिसरात अचानक पणे आरटीओ अधिका-यांनी दंडात्मक कारवाई सुरु केली सर्वसामान्य नागरिक यामुळे संतप्त झाले. आरटीओ अधिका-यांना या दंडात्मक कारवाईचा जाब विचारला त्यामुळे अधिकारी आणि सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.