
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२८ शून्य शिक्षक शाळा झाल्या आहेत तेथे निवृत्त शिक्षक किंवा बेरोजगार डीएड व बीएड धारकांना संधी देण्यासाठी आदेश दिले आहेत मात्र मेरिट लिस्ट प्रमाणे मुख्यकार्यकारी अधिकारी याबाबत निर्णय घेतील मात्र शिक्षक भरती होईपर्यंत ही नेमणूक असेल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक भरती थांबली आहे. राज्यात दोन टप्प्यांत ५० हजार शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षक भरती केली जाणार आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत असे केसरकर यांनी सांगितले.
नवीन शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या नेमणूका दिल्या जातील तो अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.