सावंतवाडीत उद्या खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 10, 2023 16:01 PM
views 174  views

सावंतवाडी : ओंकार कलामंच व सावंतवाडी तालुका व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने उद्या  मोती तलावाच्या काठावर नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा बाल गट व मोठा गट अशी होणार आहे. मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ११ हजार १११, द्वितीय क्रमांक ७ हजार ७७७, तृतीय क्रमांक ५ हजार ५५५ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

तर बालगटासाठी प्रथम क्रमांक ५ हजार ५५५, द्वितीय क्रमांक २ हजार २२२ तर उत्तेजनार्थ तीन बक्षीसं देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवक शहराध्यक्ष नईम मेमन, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळांनी भुवन नाईक - ९६०७२९३५८८, हंजला नाईक - ७२४९७७०८३८, देवेंद्र टेमकर - ९४०३०४४०१० सचिन मोरजकर - ९४२११११६१६, कृपेश राठोड - ७७६०२०८०१४, हेमंत पांगम - ९४२२५०५००३ या नंबरवर नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.