विषारी औषध प्राशन केल्याने आंबडपाडमधील एकाचा मृत्यू..!

Edited by:
Published on: September 07, 2023 20:15 PM
views 621  views

कुडाळ : विषारी औषध प्राशन केल्याने आंबडपाड येथील बच्चू राजू खरात (वय ५०) यांचा आज पहाटे उपचारा दरम्यान ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे मृत्यू झाला आहे. याची कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याची खबर त्यांचा मुलगा मयुरेश बच्चू खरात यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.

काल बुधवारी त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते, तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे दाखल करण्यात आले होते. आज पहाटे चारच्या सुमारास उपचारा दरम्यान बच्चू खरात यांचा मृत्यू झाला. याची खबर त्यांचा मुलगा मयुरेश खरात याने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.