
सावंतवाडी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर मळगाव फुलावर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करताना बीड येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल मध्यरात्री करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल आठ लाख 50 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. रामचंद्र विठ्ठल खाडे वय 45 जिल्हा बीड असे ताब्यात घेणाऱ्या संस्थेत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इनसुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.