
वेंगुर्ले : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज (१ ऑक्टोबर) राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील वेंगुर्ला मार्केट परिसर, हॉस्पिटल नाका, कॅम्प परिसर, वेंगुर्ला बंदर रोड, वेंगुर्ला बस स्थानक, वेशी भटवाडी, खांबड भटवाडी, आनंदवाडी, रामघाट रोड आणि दाभोली नाका अशा १० ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली.
वेंगुर्ला मार्केट परिसरात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याबरोबर भाजी विक्रेते, किरकोळ विक्रेते, फळ विक्रेते अशा सर्व व्यापाऱ्यानी सहभाग घेतला. हॉस्पिटल नाका परिसरामध्ये नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाच्या ग्रीन नेचर क्लब, NCC चे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग घेतला. वेंगुर्ला बंदर या ठिकाणी स्वामीनी बचत गटाच्या महिला व स्थानिक मच्छीमार यांनी सहभाग घेतला. वेंगुर्ला बस स्थानक या ठिकाणी आगार प्रमुखासह चालक , वाहक व इतर कर्मचारी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. वेशी भटवाडी या ठिकाणी होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी, बाल गणेश मंडळाची तरुण मुले, स्थानिक माजी नगरसेवक आणि नागरिक यांनी सहभाग घेतला. खांबड भटवाडी या ठिकाणी सखी महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत,गौरी महिला बचत गट, दीप्ती महिला बचत गटाच्या महिला आणि इतर नागरिकांनी सहभाग घेतला. आनंदवाडी या ठिकाणी असलेले एकता बचत गटाच्या महिला आणि नागरिक यांनी सहभाग घेतला. रामघाट रोड या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, रोटरी क्लब चे सदस्य आणि इनरव्हील क्लब च्या महिला सदस्या यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. दाभोली नाका परिसरात नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे स्वयंसेवक, शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला.