
कणकवली : कणकवली नगरपंचायत ने मागील पाच वर्षात उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळेच कणकवली नगरपंचायतीचे महाराष्ट्रात नाव झाले. कर वसुलीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या सह सर्वच सत्ताधारी नगरसेवकांचा आमदार नितेश राणे यांनी सत्कार करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मागील पाच वर्ष कणकवलीच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला नाही व विकासात्मक कामे आपण कणकवली वासियांसाठी केली आहेत. त्यामुळे भविष्यात फिर एक बार कणकवली मे बीजेपी की सरकार असा नारा कणकवलीतील नागरिकच देतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, चारू साटम, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.