
कुडाळ:मी केलेल्या विकासाच्या जोरावर हुमरसची जनता पुन्हा मला सरपंच पदावर विराजमान करेल असे सांगत विरोधकांना शिवसेनेचे हुमरस ग्रामपंचायत चे उमेदवार अनुप नाईक यांनी चांगलेच लक्ष्य केले आहे.अनुप नाईक यांची प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा मी पाच वर्षात जी काम केली याच्यावर बोलावं..उगाच नको त्या विषयांवर टीका करत राहून निवडणुकीचे वातावरण बिघडू नये.मी माझ्या गावातील मी कोणावर टीका करणार नाही. कारण निवडणुकीनंतर हे सगळे मित्रच असतील.त्यामुळे आपण जनतेच्या दरबारात जाऊन मत मागणार आहे.निश्चितच मी केलेल्या पाच वर्षाच्या विकास कामांवर हुमरसची जनता मला पुन्हा सरपंच पदावर विराजमान करेल.आणि माझे सर्व सदस्य ही विजयी होतील.असा दावा करत हुमरसचे विद्यमान सरपंच आणि शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार अनुप नाईक यांनी हुमरस च्या जनतेला भावनिक साद घालत विजयी करण्याचे आवाहन केले आहे.प्रचारा समाप्तीच्या पूर्व संधेला ते मिडीयाशी बोलत होते.