मंत्री राणेंच्या शिफारशीने तब्बल ३८ कोटींच्या कामांना मंजुरी

कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण मध्ये विकास कामांचा धडाका
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 14, 2023 19:57 PM
views 311  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे व कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने पुरवणी अर्थसंकल्पीय अनुदान डिसेंबर २०२३ अंतर्गत रस्ते व पूल या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून देण्यात आला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी प्राप्त करून दिला जात आहे.

सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार नितेश राणे यानी शिफारस केलेल्या ५३ कोटी ६२ लाख रूपयांच्या ५२ कामांना मंजूरी देण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी शिफारस केलेल्या ३८ कोटी ३५ लाख रूपयांच्या ६ कामांनाही मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे कणकवली, देवगड वैभववाडी व मालवण तालुक्यातील दळणवळणाची अत्यंत महत्त्वाची व प्रलंबित रस्ते व पूलांची कामे मार्गी लागणार आहेत.