विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त १० फेब्रुवारीला कोलगाव इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन

Edited by:
Published on: February 09, 2025 17:37 PM
views 175  views

सावंतवाडी : तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त सोमवारी १० फेब्रुवारी रोजी कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यानिमित्त सकाळी ९ वाजता विश्वकर्मा पूजन, सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी १२:३० वाजता विद्यार्थ्यांचा गुणगौरव, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता हळदी कुंकू, सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजने,  विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार  मंडळाचे नाटक होणार आहे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विश्वकर्मा सुतार मंडळाचे अध्यक्ष शंकर मेस्त्री, सचिव अमीदी मेस्त्री, खजिनदार संतोष मेस्त्री यांनी केले आहे.