विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांचा ट्रीझर लाॅच..!

Edited by: भरत केसरकर
Published on: October 03, 2023 11:47 AM
views 201  views

कुडाळ : भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या वाढदिवसाचा ट्रीझर लॉन्च करण्यात आला आहे. भाजप युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवसानिमित्त ९ ते १५ ऑक्टोबर असे आठवडाभर  सामाजिक व सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत.

यासाठी विशाल परब मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. गोवा व सिंधुदुर्ग प्रथमच जुबिन नौटियाल यांच्या लाईव्ह गाण्याच्या शो होणार आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाने होणार आहे. दरम्यान या संर्पुण कार्यक्रमाचा ट्रीझर आज विशाल परब मित्रमंडाकडून लाॅन्च करण्यात आला.याबाबची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.