शिवजयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पेतून आयोजित विविध स्पर्धांना दोडामार्गमध्ये उदंड प्रतिसाद

Edited by: संदीप देसाई
Published on: February 17, 2023 17:56 PM
views 318  views

दोडामार्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आई सेवा चॅरीटेबल ट्रस्ट पडवे यांच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा दोडामार्ग तालुक्यात साटेली- भेडशी इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

  दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रशाला मधील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, पदाधिकारी रमेश दळवी,  हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, शिक्षक दीपक दळवी राजाराम फर्जंद, सतीश धरणे यांच्या प्रमुख उपसथितीत या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी शेकडो विद्यार्थी व विविध शाळांचे मराठी विषयाचे शिक्षक उपस्थित होते. विविध गटात चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांतून मुलांमध्ये पुन्हा एकदा शिवजागर करण्यात आला.