
कणकवली :कणकवली श्री देवीचौंडेश्वरी मंदिर येथे शाकंभरी उत्सवानिमित्त तब्बल ६४ भाज्यांचे नैवेद्य दुपारी अर्पण करण्यात आला. यासाठी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र व चौंडेश्वरी देवस्थान कमिटीच्या वतीने हा नैवेद्य दाखवण्यात आला.
महाराष्ट्र मध्ये सर्वच ठिकाणी शाकंभरी उहोत्सवानिमित्त देवींच्या चरणी विविध कार्यक्रम होत आहेत. त्यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ कणकवली यांच्यावतीने देखील गेली सात दिवस शाकंबरी सप्ताह साजरा केला. या सात दिवसात चौंडेश्वरी मंदिर येथे समाजातील सर्व बांधव जमून सकाळी देवीची पूजाअर्चा करतात व सायंकाळी ८ वा देवीची आरती करण्यात येते आज शाकंबरी पौर्णिमेनिमित्त शेवटच्या दिवशी सत्यांबा पूजा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला व सायंकाळी हळदीकुंकू कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता