मंत्री केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग शिवसेनेने केला दहावी बारावीतील गुणवंतांचा गौरव..!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 19, 2023 20:19 PM
views 87  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून बुधवारी दोडामार्ग तालुक्यातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.     

येथील महालक्ष्मी सभागृहात झालेल्या या गुणगौरव सोहळ्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, रामदास मेस्त्री, भगवान गवस, श्री. महाले, कार्यालय प्रमुख गुरु सावंत आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

तर मंगळवारी साटेली भेडशी येथे करुणा सदन न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेऊन या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तेथे वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.