मानसीश्वर जत्रोत्सवानिमित्त डॉ. गद्रे रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी

Edited by:
Published on: February 02, 2025 20:00 PM
views 198  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध जत्रोत्सव मानसीश्वर जत्रोत्सवाचे औचित्य साधून मानसीश्वर ट्रस्ट वेंगुर्ला व डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय वेंगुर्ला यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी  शिबिर ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. 

विलास कुबल यांच्या सौजन्याने उभादांडा मानसीश्वर पेट्रोल पंप शेजारी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तपासणी करणाऱ्या रुग्णांचे  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोतीबिंदू शत्रक्रिया सोडून बाकी सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या सुविधा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध असणार आहेत. माफक दरात मशीन द्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असून माफक दरात चष्मा वाटप केले जाईल. तसेच नेत्रपटल शस्त्रक्रिया (डोळ्याचा मागचा पडदा) व इंजेक्शन, तिरळेपणावरची व अश्रू पिशवीची शस्त्रक्रिया, काचबिंदू शत्रक्रिया डॉ. गद्रे रुग्णालय वेंगुर्ला येथे महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत  मोफत केले जातील. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.