मनिष दळवींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा व युवा मोर्चाकडून विद्यार्थ्यांना खाऊ - वह्या वाटप

Edited by: दिपेश परब
Published on: August 02, 2023 16:14 PM
views 183  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला, भाजप युवा मोर्चा यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. या निमित्त श्री. शिवाजी प्रागतिक शाळा कॅम्प वेंगुर्ला येथे खाऊ वाटप तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री - सिंधुदुर्ग रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी  भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भुषण आंगचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, युवा मोर्चा सोशल मिडिया अध्यक्ष अमेय धुरी, युवा मोर्चा बुथ अध्यक्ष गौरेश खानोलकर, बुथ अध्यक्ष पुंडलिक हळदणकर तसेच प्रशालेचे श्री. कालिदास खानोलकर, श्रीम. अश्विनी देसाई, श्रीम. वंदना शितोळे, श्रीम. स्मिता कोणेकर ( अंगणवाडी ), श्रीम. निशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.