शिवसेनेच्यावतीने आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांना टेंडच वाटप

Edited by: विनायक गावस
Published on: July 18, 2023 13:27 PM
views 231  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने सावंतवाडी आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांना टेंडच वाटप करण्यात आले.


याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, अब्जु सावंत, परशुराम चलवाडी, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर आदी उपस्थित होते.